सर्व क्रीडा शिक्षक यांनी आपली chest number ची सिरीज लिहून ठेवावी . त्या प्रमाणे त्याचे वाटप होईल. चेस्ट नंबर हे मंगळवारी मिळतील.तुमच्या शाळेचे शिपाई किंवा कोणताही स्टाफ येणार असेल तर शाळेचे लेटर हेड वर तुमच्या शाळेच्या नावा समोर जे नंबर लिहिले आहेत त्या नंबर चे चेस्ट नंबर देण्यात यावेत या करीता जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्या नावे पत्र तयार करून ठेवावे. या पत्रा मध्ये ____ ते ___ चेस्ट नंबर माझ्या खेळाडूंना देण्यात यावेत व स्पर्धा झाल्यानंतर हे चेस्ट नंबर जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांना त्वरीत देण्याची जबाबदारी शाळेची राहील असे न झाल्यास चेस्ट नंबर चे लागणारी रक्कम शाळा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर याच्या नावे बँकेत जमा करेल असे वाक्य टाकावे . व चेस्ट् नंबर घ्यायला येताना हे पत्र शाळेच्या स्टाफ बरोबर पाठवावे. स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धेच्या दिवशी चेस्ट नंबर तुम्हाला श्री संजय घोडके सर यांच्याकडे मैदानावरच परत करणे बंधनकारक आहे. चेस्ट नंबर कधी न्यायला यायचे हे मी आज रात्री पोस्ट करेन. कार्यालयीन वेळेत चेस्ट् नंबर देण्यात येतील .
No comments:
Post a Comment