Wednesday, October 25, 2023

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३-२४ ( १४ आणि १९ वर्ष मुले व मुली फक्त)

 

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३-२४ ( १४ आणि १९ वर्ष मुले व मुली फक्त)

 

१४ वर्षाखालील मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २७/१०/२०२३ रोजी राजीव गांधी मनपा क्रीडांगण, सर्वोदय नगर, नाहुर गाव, मुंबई येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी मुले आणि मुली उपस्थिती सकाळी ८.३० वाजता आहे.

१९ वर्षाखालील मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक २८/१०/२०२३ रोजी राजीव गांधी मनपा क्रीडांगण, सर्वोदय नगर, नाहुर गाव, मुंबई येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी मुले आणि मुली उपस्थिती सकाळी ८.३० वाजता आहे.

सर्व सामने १५ पॉईंटचे ०३ सेट यानुसारच होतील तसेच सामन्याच्या वेळा, स्थळ अथवा सेट इ बदलण्याचे अधिकार आयोजन समितीकडे असतील याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. याबाबत कोणीही आयोजन समितीसोबत वाद घालु नये.

तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी आवश्यक साहित्य आणि पोषाख सोबत असणे आवश्यक आहे.

 


No comments:

Post a Comment