अनुदानित आणि
विना अनुदानित खेळ प्राथमिक प्रवेशिका २०२४-२५
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांचेमार्फत सन २०२४-२५ हया वर्षाकरिता
अनुदानित खेळ (वैयक्तिक आणि सांघिक) आणि
विना अनुदानित खेळ (वैयक्तिक आणि सांघिक) अशा दोन प्रकारच्या प्राथमिक प्रवेशिका
सुरु करण्यात आलेल्या आहेत. या वर्षी एकुण ९३ खेळ समाविष्ठ आहेत. सन २०२२-२३
पर्य़ंत शालेय क्रीडा स्पर्धा ही अनुदानित ४९ खेळांचीच होत होती. मागील वर्षीपासुन
शासनाने नविन ४४ खेळांचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला आहे. या नविन
खेळांना शासनाकडुन कोणतेही आर्थिक सहाय्य केले जात नाही यास्तव त्यांना विना
अनुदानित खेळ असे नाव शासनाने दिलेले आहे. या ४४ खेळांपैकी ज्या ज्या खेळांच्या
संघटनांनी त्यांच्या खेळांबाबत माहिती आणि या वर्षीची जिल्हास्तर स्पर्धा घेण्याची
तयारी दर्शविलेली आहे अशा खेळांची प्राथमिक प्रवेशिका “विना अनुदानित खेळ” या
प्रकारात सुरु करण्यात आलेली आहे. मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शाळा / कनिष्ठ
महाविदयालयांनी ज्यांना या नविन खेळांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या “विना
अनुदानित खेळ” प्राथमिक प्रवेशिका मध्ये जाऊन त्याची फी भरुन विहीत मुदतीतच त्या
खेळामधील आपला प्रवेश निश्चित करावा. अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक
प्रवेशिका ओपन करुन त्यामधील खेळ पाहुनच आपला प्रवेश निश्चित करावा.
No comments:
Post a Comment