जिल्हास्तर कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस, अर्चरी, मॉडर्न पेंटेथलॉन या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ०५.३० ते २३/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
No comments:
Post a Comment