Thursday, August 22, 2024

खालील तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आलेली आहे.

 खालील तालुकास्तर आणि जिल्हास्तर खेळांचे प्लेअर आय डी अपलोड करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आलेली आहे. ज्या शाळा महाविदयालयांनी अदयाप प्लेअर आय डी अपलोड केलेली नाही त्यांनी याच कालावधीमध्ये प्लेअर आय डी अपलोड करावेत. यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यानंतर प्लेअर आय डी अपलोड करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

१) जिल्हास्तर क्रिकेट -: अंतिम मुदत २९/०८/२०२४

२) जिल्हास्तर कॅरम -: अंतिम मुदत ३१/०८/२०२४

३) जिल्हास्तर तलवारबाजी -: अंतिम मुदत ३१/०८/२०२४

४) जिल्हास्तर ज्युदो -: अंतिम मुदत ०३/०९/२०२४

५) जिल्हास्तर मल्लखांब -: अंतिम मुदत ०६/०९/२०२४

६) तालुकास्तर बास्केटबॉल -: अंतिम मुदत ०३/०९/२०२४


                          शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला / वैयक्तिक खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

                    ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment