सर्व क्रीडा शिक्षकांना कळविण्यात येते की, अनेक शिक्षक खेळाडुंचे प्लेअर आय डी तयार करताना त्यांच्या जन्मतारखेमध्ये चुका करीत आहेत. तसेच ऑनलाईन सिस्टीमध्ये केवळ जन्मतारीख दाखला आणि आधारकार्ड अपलोड करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे अशी चुक झाल्यानंतर संबंधित शिक्षकांनी त्यांच्या शाळेच्या लेटर हेडवरच त्या खेळाडुची ऑनलाईन सिस्टीमध्ये नमुद केलेल्या चुकीच्या जन्मतारीखा आणि आता ऑनलाईन सिस्टीम मध्ये त्या खेळाडूंच्या नमुद करावयाच्या योग्य जन्मतारखा हे शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या सही व शिक्क्यासह अपलोड करावी. तसेच यासोबत आधारकार्ड ज्यावर संपुर्ण जन्मतारीख नमुद असणे आवश्यक अथवा त्या खेळाडुचा जन्मतारखेचा साक्षांकीत दाखला या दोनपैकी एक कोणताही पुरावा जोडणे आवश्यक आहे. शाळेच्या लेटरहेडवर मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही शिक्का आणि वरील नमुदपैकी एक पुरावा (जन्मतारीख दाखला अथवा आधारकार्ड) हे सिस्टीममध्ये अपलोड न केल्यास त्यांची मान्यता या कार्यालयाकडुन देण्यात येणार नाही याची सर्वांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच जन्मतारीख दुरुस्ती ही संबंधित खेळाडुचा खेळ सुरु होण्यापुर्वी होणे आवश्यक आहे. स्पर्धेची भाग्यपत्रिका (ड्रॉ) तयार झाल्यानंतर जन्मतारखेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच यामुळे खेळाडूचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याची जबाबादारी संबंधित शाळेची असेल याचीही स्पष्टपणे नोंद घ्यावी.
वर नमुद केल्याप्रमाणेच विहीत नमु न्यातील अर्ज आणि पुरावा जोडुन ऑनलाईन सिस्टीमध्ये शाळांनी अर्ज करावा. विहीत नमुन्यात आणि योग्य पुराव्याशिवाय प्राप्त अर्ज नाकारण्यात येतील याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment