Thursday, September 10, 2026

जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७

📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢

*जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७*

जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे.

 मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६
वयोगट: १४ वर्षांखालील मुले व मुली
Reporting Time: सकाळी ९.०० वाजता

 बुधवार, १६ सप्टेंबर २०२६
वयोगट: १७ वर्षांखालील मुले व मुली
Reporting Time: सकाळी ९.०० वाजता

गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६
वयोगट: १९ वर्षांखालील मुले व मुली
Reporting Time: सकाळी ९.०० वाजता

महत्त्वाच्या सूचना :
 
खेळाडूंनी येताना  सोबत  स्वतःचा टेनिस बॉल घेऊन यावे. तसेच 

1. सर्व खेळाडूंनी स्पर्धेच्या दिवशी दिलेल्या Reporting Time पूर्वी  15 मिनिटे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

2. खेळाडूंनी सोबत ऑनलाइन ओळखपत्र (Player List & Player ID) घेऊन येणे अनिवार्य आहे.

3. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत :
   
   १. खेळाडूचे वय ५ वर्षांपर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला.
   
   २. खेळाडूने प्रथम इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदीची सत्यप्रत.
   
   ३. आधार कार्ड.

4. वरील सर्व कागदपत्रे सर्व स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे संबंधित खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील सहभागी खेळाडूंना सदर सूचनांची माहिती देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.

No comments:

Post a Comment