📢 अत्यंत महत्त्वाची सूचना 📢
🏏 क्रिकेट | 🏀 बास्केटबॉल | 🏋️ वेटलिफ्टिंग | 🎾 सॉफ्टटेनिस
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर अंतर्गत सन २०२६-२७ मधील शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
🔹 2nd Additional Form सादर करण्याची अंतिम मुदत :
📅 १८ सप्टेंबर २०२६
तरी सर्व संबंधित प्राचार्य/मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी विहित मुदतीत 2nd Additional Form अनिवार्यपणे सादर करावा.
📌 खेळाडू नोंदणी (Player Registration/Upload) अंतिम दिनांक :
🏋️ वेटलिफ्टिंग — २०/०९/२०२६
🏀 बास्केटबॉल — २२/०९/२०२६
🏏 क्रिकेट — २५/०९/२०२६
🎾 सॉफ्टटेनिस — २७/०९/२०२६
🏆 आगामी क्रीडा स्पर्धांचे नियोजन :
🛑 वेटलिफ्टिंग – जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा
📅 दिनांक २२ ते २३ सप्टेंबर २०२६
🛑 बास्केटबॉल – कुर्ला तालुकास्तरीय शालेय स्पर्धा
📅 दिनांक २४ सप्टेंबर २०२६ पासून
🛑 क्रिकेट – जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा
📅 दिनांक २८ सप्टेंबर २०२६ पासून
🛑 बास्केटबॉल – बोरीवली तालुकास्तरीय शालेय स्पर्धा
📅 दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ पासून
🛑 बास्केटबॉल – अंधेरी तालुकास्तरीय शालेय स्पर्धा
📅 दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ पासून
⚠️ सर्व संबंधितांनी वरील दिनांकांची गांभीर्याने नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी.
विहित अंतिम मुदतीनंतर अर्ज/खेळाडू नोंदणी प्रलंबित राहिल्यास किंवा त्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची राहील, याची कृपया नोंद घ्यावी.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. अभिजीत गुरव
क्रीडा कार्यकारी अधिकारी
📱 ८१०८६१४९११
— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर
No comments:
Post a Comment