Thursday, September 24, 2026

🏀 बोरीवली तालुकास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏀

🏀 बोरीवली तालुकास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ 🏀

सर्व संबंधित क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व संघप्रमुख यांना सविनय कळविण्यात येते की, सन २०२६-२७ मधील बोरीवली तालुकास्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

📅 स्पर्धेचा कालावधी :
दिनांक ०१ ते ०५ ऑक्टोबर २०२६

📍 स्पर्धेचे ठिकाण :
मोतीलाल नगर, BMC शाळा, गोरेगाव पश्चिम, मुंबई.

🏀 वयोगटनिहाय स्पर्धेचे वेळापत्रक

🔹 ०१ ऑक्टोबर २०२६ – १४ वर्षांखालील मुली
🔹 ०२ ऑक्टोबर २०२६ – १४ वर्षांखालील मुले
🔹 ०३ ऑक्टोबर २०२६ – १७ वर्षांखालील मुली 
🔹 ०४ ऑक्टोबर २०२६ – १७ वर्षांखालील मुले 
🔹 ०५ ऑक्टोबर २०२६ – १९ वर्षांखालील मुले व मुली

⏰ अत्यंत महत्त्वाची सूचना :
सर्व संबंधित क्रीडा शिक्षक / क्रीडा प्रशिक्षक यांनी आपल्या संघास संबंधित वयोगटाच्या निर्धारित दिनांकास व नियोजित रिपोर्टिंगच्या वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी.

⚠️ विशेष सूचना :
Upper Half व Lower Half मधील सामन्यांसाठी रिपोर्टिंगची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे संबंधितांनी आपल्या संघास लागू असलेली रिपोर्टिंगची वेळ व सामन्याचे वेळापत्रक काळजीपूर्वक तपासून त्यानुसार उपस्थित राहावे.

📋 स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रे

१. Player List
२. Player ID / Online Identity Card
३. जन्मतारखेचा दाखला / प्रमाणपत्र
४. शाळेच्या General Register मधील जन्मतारखेच्या नोंदीची सत्यप्रत
५. आधार कार्ड
६. शाळेचे ओळखपत्र

📌 महत्त्वाचे :
सर्व सहभागी खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. तसेच वरील सर्व आवश्यक कागदपत्रे स्पर्धेच्या वेळी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित शाळा / संघप्रमुख यांनी घ्यावी.

तसेच, सर्व संबंधितांनी निर्धारित दिनांक, वेळ व ठिकाणी वेळेत उपस्थित राहून स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी आवश्यक ते सहकार्य करावे.

स्पर्धेच्या अनुषंगाने कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व संघप्रमुख यांनी आवश्यक पूर्वतयारी करून योग्य ती दक्षता घ्यावी, ही नम्र विनंती.

— जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
मुंबई उपनगर

No comments:

Post a Comment